परभणीत कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

file photo
file photo
Updated on

सेलू (जि.परभणी) ः सेलू शहरातील एका ४५ वर्षीय महिलेचा मंगळवारी (ता. नऊ) कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या तीन झाली आहे.
सदरील महिला मुंबई येथून मागील आठवड्यात सेलू येथे आल्यानंतर तिला सेलूतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिला प्रकृती अस्वस्थ वाटत असल्यामुळे परभणीच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मृत महिला सेलू येथील राजीव गांधीनगरातील रहिवासी आहे. सदर महिला मागील आठवड्यात सेलू येथे परतली होती. तिला काही शारीरिक व्याधी असल्याने सेलूच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर तिच्यावर परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाने तिचा स्वॅब तपासणीसाठी तीन दिवसांपूर्वी नांदेड येथील प्रयोग शाळेत पाठविला होता. त्याचा अहवाल मंगळवारी (ता. नऊ) सकाळी आला. त्यात ही महिला पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतर काही वेळातच या महिलेचा मृत्यू झाला. सदर महिलेवर परभणीत अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

मानवतमध्ये एक पॉझिटिव्ह
मानवत शहरातील एका ४४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याची प्रकृती मात्र स्थिर असल्याचे सांगण्यात येते. या महिलेच्या मृत्यूनंतर परभणी जिल्ह्यातील करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या आता तीन एवढी झाली आहे.

१२ जणांची सोमवारी कोरोनावर मात
परभणी जिल्ह्यातील १२ जणांना कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळाली आहे. या बारा जणांना सोमवारी (ता. आठ) घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी (ता. आठ) सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण चार संशयित दाखल झाले असून संशयितांची संख्या दोन हजार ४८३ पर्यंत पोचली आहे. नांदेड प्रयोग शाळेत ६८ संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. सोमवारी जिल्हा रुग्णालयातून एकूण १२ जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी पाठविण्यात आले आहे. यात फुलेनगर पूर्णा येथील तीन मुले, माटेगाव (ता. पूर्णा) येथील तीन महिला व तीन पुरुषांना घरी पाठविण्यात आले. तर गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील एक पुरुष व दोन महिला कोरोनामुक्त झाल्या आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathwada Rain Waiting
Maharashtra Earthquake
Senior Congress Leader Shriram Patil Rajurkar Passes Away
Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
Marathi News Esakal
www.esakal.com